CITY CINE AWARDS 2025 CITY CINE AWARDS 2025

रेडिओ सिटी आयोजित `कॉटन किंग प्रस्तुत सिटी‌ सिने अवॉर्ड्स मराठी`! या पुरस्काराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट कोण, हे रेडिओ सिटीचे श्रोते अर्थातच रसिक प्रेक्षकच त्यांचे मत देऊन ठरवतात. पुरस्कार निवडीच्या निर्णय प्रक्रियेत जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे हा लोकांच्या पसंतीचा पुरस्कार आहे. आपल्या अतुलनीय योगदानामुळे मराठी चित्रपटांना प्रभावशाली ओळख मिळवून देणाऱ्या विविध मंडळींचा सन्मान करणे आणि त्याद्वारे मराठी चित्रपटांचे महत्त्व अधोरेखित करणे ही या पुरस्कारामागची प्रमुख प्रेरणा आहे. मराठी चित्रपटांतील वैविध्यपूर्ण विषय, नवनवे प्रयोग, प्रभावी सादरीकरण तसेच उत्कृष्ट कौशल्यांना प्रोत्साहन देणे हे या पुरस्काराचे प्रमुख उद्दिष्टे आहे. `कॉटन किंग प्रस्तुत सिटी‌‌ सिने अवॉर्ड्स मराठी` हा रेडिओ सिटी म्हणजेच ऑन एअर आणि डिजिटल माध्यम यांच्या सहयोगातून आयोजित केला जाणारा पहिलाच पुरस्कार आहे. रेडिओ सिटीचे श्रोते मराठी चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना त्याचप्रमाणे कलाकार आणि तंत्रज्ञांना निवडण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवतात तसेच या रसिक प्रेक्षकांच्या हस्तेच प्रस्तुत पुरस्कारांचे वितरण होते. यामुळे मराठी चित्रपटांबाबत एक विशेष आत्मीयता तयार होण्यास तसेच आपले चित्रपट घराघरात पोहोचण्यास मदत होते. म्हणूनच आम्ही अभिमानाने म्हणतो येथे `जनताच आहे जज`!

PRESENTING SPONSOR
CRYPTO PARTNER

WINNERS

पाणी
सर्वोत्कृष्ट चित्रपट
स्नेहल तरडे
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
क्षितीश दाते
सर्वोत्कृष्ट अभिनेता
तेजश्री प्रधान
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
यशराज मुखाटे - लव्ह चुंबक
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
समीर सामंत - नवसाची गौराई माझी
सर्वोत्कृष्ट गीतकार
शंकर महादेवन - पाणी शीर्षक गीत
सर्वोत्कृष्ट गायक
वैशाली सामंत - वारा गं मंदी वार
सर्वोत्कृष्ट गायिका
महेश मांजरेकर
सर्वोत्कृष्ट पटकथा
नम्रता संभेराव
किंग ऑफ एंटरटेनमेंट
छाया कदम
मराठी पाऊल पडते पुढे

Copyrights © 2025 Radiocity.in